शिवाजी विद्यापीठात राजे उमाजी नाईक यांची जयंती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वाणिज्य… Continue reading शिवाजी विद्यापीठात राजे उमाजी नाईक यांची जयंती

विरोधकांच्या एकजुटीसाठी शरद पवार-नितीशकुमार भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भेट घेतली आहे. नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर ते पहिल्यांदा दिल्लीच्या दौऱ्यावर आले आहेत. या दिल्ली दौऱ्यात नितीशकुमार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, डाव्या पक्षांचे नेते सिताराम येचुरी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. २०२४ च्या… Continue reading विरोधकांच्या एकजुटीसाठी शरद पवार-नितीशकुमार भेट

कोंडिग्रे येथील वाटमारी प्रकरणी दोघे ताब्यात, दुचाकी जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे गावच्या हद्दीत वाटमारी करताना रात्री दुचाकीस्वारास अडवून आणि बेदम मारहाण करुन जबरदस्तीने दुचाकी काढून घेणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४० हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. नागनाथ दिनकर कांबळे (मंगलनगर-कोंडिग्रे) हे दि. ३ सप्टेंबर रोजी काम संपल्यावर रात्री दुचाकीवरून घरी जात होते. गावच्या हद्दीत… Continue reading कोंडिग्रे येथील वाटमारी प्रकरणी दोघे ताब्यात, दुचाकी जप्त

सेन्सेक्समध्ये ४०० अंकांची घसरण

मुंबई : शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात घसरणीने झाली. जागतिक शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. त्याचा दबाव भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर बीएसई निर्देशांक सेन्सेक्स ४०७.७३ अंकांच्या घसरणीसह ५८,७८९.२६ अंकावर खुला झाला. एनएसई निर्देशांक निफ्टीमध्ये… Continue reading सेन्सेक्समध्ये ४०० अंकांची घसरण

पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रूड) किमती ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती प्रतिलिटर ३ रुपयांनी कमी होऊ शकतात. याआधी फेब्रुवारीमध्ये कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ९० डॉलरच्या जवळ होता. कच्च्या तेलाच्या दारात घसरण सुरूच आहे.… Continue reading पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

राज्यात अनंत चतुर्दशीला पावसाचा जोर वाढणार

मुंबई (प्रतिनिधी) : ऑगस्ट महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला संततधार सुरू केली. गौरी गणपतीच्या विसर्जनादिवशी कोकणासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आता अनंत चतुर्दशीला म्हणजेच शुक्रवारी राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद,… Continue reading राज्यात अनंत चतुर्दशीला पावसाचा जोर वाढणार

सैफअली खान-ह्रतिक रोशन करणार १० शहरांचा दौरा

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट चर्चेत आला आहे. त्याचा ट्रेलर आता प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी या दोन्ही अभिनेत्यांनी देशातील दहा शहरांचा दौरा करण्याचे ठरवले आहे. हल्ली टीझर, ट्रेलरच्या प्रमोशनसाठी देखील मोठ्या प्रमाणात प्रमोशन करावे लागत असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी यावरुन… Continue reading सैफअली खान-ह्रतिक रोशन करणार १० शहरांचा दौरा

लक्ष्मी महाविद्यालयात तीन नवीन अभ्यासक्रमांना मान्यता

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यतील तिटवे येथील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाशी संलग्नित शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाला चालू शैक्षणिक वर्षात नवीन मास्टर डिग्रीचे सूक्ष्म जीवशास्त्र (एम.एस्सी.- मायक्रो बायोलॉजी), रसायनशास्त्र (एम.एस्सी- केमिस्ट्री) आणि संगणक शास्त्र (एम.एस्सी- कॉम्प्युटर सायन्स) या पदव्युत्तर अभ्यासक्रमास शासनाची मान्यता मिळाली आहे. या लक्ष्मी महाविद्यालयामध्ये थेट प्रवेश मिळणार असल्याने या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थिनींना… Continue reading लक्ष्मी महाविद्यालयात तीन नवीन अभ्यासक्रमांना मान्यता

संजय राऊतांना भेटण्यास ठाकरेंना परवानगी नाकारली

मुंबई (प्रतिनिधी) : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संजय राऊत सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इच्छुक होते; मात्र आर्थर रोड कारागृह प्रशासनाने ठाकरेंना परवानगी नाकारली आहे. मात्र त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी हे वृत्त फेटाळले आहे.… Continue reading संजय राऊतांना भेटण्यास ठाकरेंना परवानगी नाकारली

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने सुनावणी पुढे ढकलली आहे. आता यावर २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला २७ सप्टेंबरपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचे आदेश दिले आहेत. मागच्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी… Continue reading महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत स्थगित

error: Content is protected !!