कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल विभागाच्या ५७ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. डीएक्ससी, वरली, सुदर्शन केमिकल्स, लक्ष्मी ऑरगॅनिक्स, स्मृती ऑरगॅनिक्स, अक्वाटेक, कॉग्निझंट, बिर्ला सॉफ्ट, डीआरडीओ आदी नामांकित कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना सुविधांसोबत भरघोस पगाराच्या नोकऱ्या प्राप्त झाल्या आहेत.

केमिकल विभागाने आपली प्लेसमेंटची यशस्वी घोडदौड यंदाही कायम ठेवली आहे. लस, औषधे निर्मिती, प्लास्टिक, टेक्सटाइल, खते, सिमेंट, पेंटस, बी- बियाणे, तणनाशके, सुगंधी द्रव्ये निर्मिती, फूड टेक्नॉलॉजी इत्यादी मूलभूत गरजा पूर्ण करणारी शाखा असल्याने केमिकल अभियंत्यांची मागणी उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. केमिकल विभागाच्या १५ विद्यार्थ्यांना अमेरिका, जर्मनी, इंग्लंड इत्यादी प्रगत देशांमध्ये उच्च शिक्षणासाठी संधी मिळाली आहे. केमिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक वृंद यांच्या मार्गदर्शनाचा तसेच महाविद्यालयातील फॉरेन लँग्वेज क्लब व हायर एज्युकेशन क्लबचा देखील या विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला आहे.

केमिकलचे विभागप्रमुख डॉ. के. टी. जाधव, डॉ. अमर जाधव, शिक्षक, प्लेसमेंट इन्चार्ज डॉ. राहुल महाजन, ट्रेनिंग इन्चार्ज प्रियांका पाटील, कॅम्पस ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग हेड मकरंद काईंगडे यांचे या विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व माजी सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यानी यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.