सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची  आज मतमोजणी होत आहे. भाजपप्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनलने १० जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनलला ७ जागा मिळालेल्या आहेत. या निकालामुळे जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण झाले आहे.

सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली पराभूत झाल्याने भाजपला धक्का बसला आहे. तर  महाविकास आघाडीचे सुशांत नाईक विजयी झाले आहेत. सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे भाऊ  आहेत.

सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघामध्ये भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या सुरेश दळवी यांचा पराभव केला आहे.