कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पोलीस ठाणे परिसरात दोन वेगळ्या ठिकाणी पाळीव जनावरे चोरीच्या घटना घडल्या आहेत. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील शेतात खतासाठी बसवण्यात आलेल्या २० मेंढ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याची फिर्याद युवराज महादेव येडके (रा. सैनिक टाकळी) यांनी पोलिसांमध्ये दिली आहे.

सैनिक टाकळी येथील सुरेश हाके आणि विनोद यंकापगोळ यांच्या मालकीच्या मेंढ्या उघडयावर खतासाठी बसवण्यात आल्या होत्या. बुधवारी मध्यरात्री सुमारास अज्ञात चोरट्यानी कळपातील २० शेळ्या चोरुन नेल्या आहेत.  तर शिरोळ तालुक्यातील राजापूर येथील शेतातील गोठ्यातून दोन म्हैशी अज्ञाताने चोरून नेल्याची फिर्याद प्रदिप रमेश पाटील (रा. राजापूर) यांनी  पोलिसांत दिली आहे.