रांगोळी (प्रतिनिधी) : हुपरी येथील चर्मकार समाजाच्या दोन गटात  अतिक्रमण होत असल्याच्या कारणावरून जोरदार मारामारी, शिवीगाळ व  दगडफेकीची घटना गुरूवारी रात्री उशीरा झाली. यात ११ जण जखमी झाले आहेत. गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी ८० जणांवर गुन्हा दाखल केला असून गावात  मोठा  पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासंदर्भात राजाराम बाळू शिराळे ( वय ६४, रा.मिलींद हौसींग सोसायटी, हुपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

राजाराम शिराळे,  श्रीपती शिराळे,  राजाराम शिराळे,  कुमार शिराळे, वैशाली  शिराळे, रंजना जाधव, दिपाली  शिराळे, लक्ष्मी  शिराळे,  रुपाली शिराळे,  कविता  शिराळे, निलावती शिराळे  अशी जखमींची नांवे आहेत.  तर सागर केंबळे, अमृत केंबळे,  पिंटू केंबळे, सुभाष टोणपे,  गणेश शिराळे , विजय शिराळे,  मंगल शिराळे, माणिक टोणपे (सर्व रा. हुपरी)  यांच्याह ८० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुपरी येथील गट नं- 925/8 अ 1 मध्ये झोपड्या बांधून अतिक्रमण करीत असल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली.  त्यानंतर अतिक्रमण करणाऱ्या  लोकांना समजावून सांगण्यासाठी राजाराम  शिराळे गेले होते.  त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली.