कोल्हापूर (प्रतिनिधी) : ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत  आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात  आज (शुक्रवार)) रात्री १२ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू केले आहेत. याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत.

लागू केलेले निर्बंध खालीलप्रमाणे :-

– विवाह समारंभासाठी बंदिस्त किंवा खुल्या जागेत, जास्तीत जास्त ५० व्यक्तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल.

– इतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील बंदिस्त किंवा खुल्या जागेत, जास्तीत जास्त ५० व्यक्तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल.

– अंत्यविधी, अंत्ययात्रा बाबतीत उपस्थित व्यक्तींची संख्या २० पर्यंत मर्यादित असेल.

या आदेशात नमूद केलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त दि. २९ नोव्हेंबर व २५ डिसेंबर २०२१ रोजीच्या आदेशातील सर्व निर्बंध लागू राहतील.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५  व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.