Shubman Gill Health Update: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या दरम्यान, भारतीय क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी येत आहे. डेंग्यूने त्रस्त असलेला स्टार सलामीवीर शुभमन गिल अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा सामनाही खेळू शकणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ही माहिती दिली आहे.

भारतीय संघाने विश्वचषकातील पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात संघाने 6 गडी राखून विजय मिळवला. चेन्नई येथे झालेल्या या सामन्यातही शुभमन गिल खेळला नाही.

आता भारतीय संघ आपला दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध बुधवारी (11 ऑक्टोबर) दिल्लीत खेळायचा आहे. चेन्नईतील वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली तो सध्या उपचार घेत आहे.