पन्हाळा (प्रतिनिधी) : ऐतिहासिक पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने नगरपरिषद आणि संयुक्त शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने साजरा करण्यात आला.

यावेळी पन्हाळ्यातील महिलांनी पाळणा गीत आणि शिवआरती म्हटली. यावेळी लहान मुलांना विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. मोटरसायकल रॅलीबरोबरच भव्य मिरवणूक काढण्यात आली. तर शिवजयंती निमित्त येत्या सोमवारी महाप्रसादाचे आयोजन केले असल्याचे संयुक्त शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष यांनी सांगितले.

यावेळी मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, माजी नगराध्यक्षा रूपाली धडेल, माजी नगराध्यक्ष असीफ मोकाशी, चंद्रकांत गवंडी, रविंद्र धडेल आदी मान्यवर उपस्थित होते.