कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये  निकालाच्या आधीच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील-सरूडकर यांच्या विजयाचे पोस्टर झळकले आहेत. सत्यजित पाटील समर्थकांनी खासदार पदी निवड झालेबद्दल हार्दिक अभिनंदन आशा आशयाचे पोस्टर लावल्याने दिवसभरात  जिल्ह्यात याची चर्चा सुरू आहे. सत्यजित पाटील यांचे बॅनर झळकल्यानंतर आता धैर्यशील माने यांचेही बॅनर झळकले आहेत.

दरम्यान, अत्यंत चुरशीने पार पडलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील-सरूडकर यांच्या विजयाच्या आणि ते खासदार झाल्याबद्दल अभिनंदन करण्याचे लागलेले बॅनर हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.


शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील संतोष पाटील या सत्यजित पाटील समर्थकाने खासदार म्हणून निवड झाल्याचा बॅनर लावला आहे आणि तो सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान, मतदान झालेल्या दिवशीच 7 मे रोजी शाहुवाडी परिसरामध्ये फटाक्याची आतिषबाजी करून समर्थकांनी ते खासदार झाल्याचा आनंदच व्यक्त केला होता. आता मतमोजणी – निकालाला  कालावधी असून 4 जूनला निकल आहे. तरीही त्यांच्याकडे भावी खासदार म्हणूनच आता कार्यकर्ते त्यांना बघत आहे हेच या बॅनरबाजीवरून पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. 

धैर्यशील माने यांचेही खासदार म्हणून बॅनर
हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये  महायुतीकडून धैर्यशील माने तर महाविकस आघाडीकडून सत्यजित पाटील सरूडकर आणि शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात लढत होत आहे. 7 मे ला हातकणंगले लोकसभेसाठी मतदान झाले. तर 4 जून ला निकाल होणार आहेत. पण त्याआधीच कार्यकर्ते आपापल्या नेत्यांचे खासदार म्हणून बॅनर लावत आहेत. सकाळी सत्यजित पाटील-सरूडकर यांच्या खासदार म्हणून निवड झाल्याच्या अभिनंदनाचे बॅनर झळकल्यानंतर आता धैर्यशील माने यांचेही बॅनर झळकले आहेत. त्यामुळे हातकणंगले मतदार संघात बॅनर वॉर सुरू असल्याचे दिसत आहे.