वारणानगर (प्रतिनिधी) : तात्यासाहेब कोरे औद्योगिक प्रशिक्षण संस्था वारणानगर.या संस्थेतील फिटर,इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोनिक मेक आणि वेल्डर विभागातील २७ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल पुणे या कंपनीत कँम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली आहे. कंपनीने संस्थेमध्ये गटचर्चा’ इंटरव्ह्यू आयोजित करत चार विभागांमधून विद्यार्थ्यांची निवड केली.

या विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल पुणे या नामांकित कंपनीत नोकरीची (शिकाऊ उमेदवारी) संधी मिळाली असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य बी.आय.कुंभार यांनी दिली. या कंपनीमध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वाहन क्षेत्रातील संबधीत विविध ऑपरेटिंग कंपन्या आहेत.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि आपल्या ज्ञानाचा तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी करावा असा सल्ला दिला.

तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही.व्ही. कारजिन्री, प्राचार्य बी.आय.कुंभार, गटनिदेशक आर.आर.कापरे,ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर पी.पी.पाटील, एस.एस.पाटील,बी.टी.वायदंडे, एस.आर.बुद्दे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.