भारतीयाचं सगळ्यात आवडत पेय म्हणजे चहा. ज्यादा तर भारतातील लोकांची दिवसांची सुरुवात चहानेच होते. त्यातल्या त्यात दुधाचा चहा म्हणालं की काहींच्यासाठी तर समाधानाचं. पण दुध आणि साखरेचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर नाही म्हणून काही लोक कोरा चहा म्हणजेच  ब्लॅक-टी पिण्यासाठी पसंती देतात. तर चहाला आज आपण जाणून घेणार आहोत ब्लॅक-टी पिण्याचे फायदे…

ब्लॅक-टी पिण्याचे फायदे..!

१. त्वचेसाठी फायदेशीर

ब्लॅक टीच्या नियमित सेवनामुळे आपल्या त्वचेला फायदा होत असतो. अँटी-एजिन, त्वचेला सूट चढणे अशा काही समस्यांवर कोरा चहा रामबाण इलाज समजला जातो. कोर्‍या चहामुळे तुमची स्किन हेल्दी होईल. त्याचसोबत ती ग्लो देखील करायला लागेल.

२. त्वचा पुनरुज्जीवित होण्यासाठी सहकार्य होते

आपल्या त्वचेवर जखम झाल्यास औषध लावल्यामुळे ती हळू-हळू बरी होत असते. ब्लॅक टी पिणार्‍या व्यक्तीमध्ये अशा प्रकारची जखम भरण्यासाठी प्रोसेस वेगाने चालत असते. जखम झाल्यानंतर स्किनवर त्यांच्या खुणा राहू शकतात. या खुणा दिसेनाशा होण्यासाठी बराचसा वेळ लागतो. परंतु जर तुम्ही कोरा चहा दररोज पित असाल, तर ही प्रक्रिया जलदगतीने होते.

३. हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम

ब्लॅक टी मध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटी ऑक्सिडंट असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ते दररोज प्यायल्याने उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा यासह हृदयविकाराचे अनेक जोखीम घटक कमी होण्यास मदत होऊ शकते

४. फोकस आणि एकाग्रता वाढवते

ब्लॅक टी मध्ये कॅफीन आणि एल-थेनिन नावाचा एक प्रकारचा अमीनो अॅसिड असतो, जो ऊर्जा आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकतो. एल-थेनाइन आणि कॅफिनयुक्त ड्रिंक मेंदूतील अल्फा क्रियाकलाप वाढवतात आणि लक्ष केंद्रित आणि सतर्क राहण्यावर अधिक परिणाम करतात.

५.आतड्यांचे आरोग्य सुधारते

ब्लॅक टीचे सेवन केल्याने चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस उत्तेजन देऊन आणि वाईट बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करून आतड्यांचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते. याव्यतिरिक्त त्यात अँटी मायक्रोबियल गुण आहेत जे आतड्यांतील बॅक्टेरिया नष्ट करतात आणि पचनास मदत करतात.