कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षातील हालचालींना आता वेग येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय काँग्रेसने 539 लोकसभा मतदारसंघांसाठी समन्वयकांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये देशासह राज्यातील 48 जागांचा समावेश आहे. यामध्ये आमदार सतेज पाटील यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. तर सांगलीची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. तर साताराची जबाबदारी रविंद्र धंगेकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

याबाबत काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी X वर एका पोस्टमध्ये सांगितले की, काँग्रेस पक्षाने देशातील 539 संसदीय मतदारसंघांसाठी संयोजकांची यादी जाहीर केली असून उर्वरित चार मतदारसंघांची यादी लवकरच येणार आहे. त्यांनी म्हटलं आहे की, भारत जिंकेल!”

जागा वाटपाबाबत काँग्रेसच्या पाच सदस्यीय समितीने याआधीच राज्य काँग्रेस प्रमुखांशी सल्लामसलत केली आहे आणि त्याचे निष्कर्ष पक्षप्रमुख खरगे यांना सादर केले आहेत. अशी ही माहीती यावेळी त्यांनी दिली.