पुणे ( प्रतिनिधी ) मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. ते मुंबईत पोहोचण्यास अवघे दोन दिवस उरले असताना पुण्यात जरांगे यांचं आगमन होताच त्यांना पाठींबी देण्यासाठी अभूतपूर्व गर्दी झाली होती. तसेच त्यांच्या पुण्यामधील सभेला सुद्धा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने गर्दी झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे पाच वाजता महाराज मनोज जरांगे यांची सभा पार पडली होती. यावेळी मराठा आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सकल मराठा समाजातील नागरिकांनी केलेली गर्दी राज्य सरकारला विचार करण्यास भाग पाडणारी आहे.

आरक्षण द्या या मुद्यावर थांबलेले जरांगे पाटील आपण मॅनेज होत नसल्याने सरकारची चांगलीच अडचण झाली असल्याचं म्हटलं आहे. तसेच आत्तापर्यंत वेळ दिला मात्र, याबाबत सरकार आपल्या कृतीतून नकारात्मकता दर्शवत असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे. तसेच मराठ्यांनी आताच हा मुद्दा उचलावा हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे या आंदोलनात ही मोठ्या संख्येने सामिल व्हा असे आवाहन मनोज जरांगे यांनी यावेळी केलं.