नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिकांना साथ द्या – मनोज फराकटे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कुरणी, ता.कागल येथे आयोजित महायुतीचे प्रमुख नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ बैठकीत कोल्हापूर जिल्हा परिषदचे माजी सदस्य मनोज फराकटे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या विविध योजना राबवल्या आहेत. गोरगरिबांसाठी व देशाच्या विकासासाठी काम करणाऱ्या नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी… Continue reading नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिकांना साथ द्या – मनोज फराकटे

नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी कागल मतदार संघातील जनता संजय मंडलिक यांच्या पाठीशी – सुर्यकांत पाटील.

कागल (प्रतिनिधी ) – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ बाचणी, ता.कागल येथे आयोजित महायुतीचे प्रमुख नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ बैठकीत कोल्हापूर बाजार समितीचे संचालक सुर्यकांत पाटील म्हणाले, खासदार संजय मंडलिक यांनी गेल्या पाच वर्षात रस्ते, सामाजिक सभागृह, तालीम, इमारत यासाठी कोट्यावधीचा निधी दिला. पी.एम. योजनेद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा… Continue reading नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी कागल मतदार संघातील जनता संजय मंडलिक यांच्या पाठीशी – सुर्यकांत पाटील.

मागील दहा वर्षातील काम हा देशाच्या प्रगतीचा सुवर्णकाळ – प्रताप उर्फ भैया माने

कोल्हापूर (प्रतिनिधी ) – महायुतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ निढोरी गावातील सर्वपक्षीय प्रमुख नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मागील १० वर्षातील काम हा देशाच्या प्रगतीचा सुवर्णकाळ आहे. त्यामुळे मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन… Continue reading मागील दहा वर्षातील काम हा देशाच्या प्रगतीचा सुवर्णकाळ – प्रताप उर्फ भैया माने

डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजच्या वतीने रविवारी ‘मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह

कोल्हापूर, ( प्रतिनिधी ) : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर आणि सिरी एज्युटेक, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २८ एप्रिल रोजी फार्मसी विद्यार्थ्यांसाठी ‘मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पस ड्राईव्हमध्ये १० नामांकित कंपन्यांचा सहभाग असून फार्मसी मधील पदवी, पदविका व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध… Continue reading डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजच्या वतीने रविवारी ‘मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह

कोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा अतिविराट होईल;पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ तपोवनवर सभा कोल्हापूर, ( प्रतिनिधी ) – कोल्हापुरात शनिवारी दि. २७ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. सायंकाळी चार वाजता तपोवन मैदानावर होणारी ही सभा अतिविराट होईल, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या सभेला दोन लाखावर गर्दी होईल, असेही ते म्हणाले. या… Continue reading कोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा अतिविराट होईल;पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

सोलापुरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद

सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेता श्रीनिवास करली यांच्या प्रभाग क्रमांक १९ मधील पदाधिकाऱ्यांशी संवाद सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मंगळवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेता श्रीनिवास करली यांच्या प्रभाग क्रमांक १९ मधील भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले , देशाचे लोकप्रिय पंतप्रधान… Continue reading सोलापुरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद

संकटाच्या वेळी पाठीशी उभा राहणाऱ्या धैर्यशील मानेंना निवडून द्या-सदाभाऊ खोत

बहे / प्रतिनिधी : पूर परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या जनतेला अडचणीतून बाहेर काढण्यांसाठी बहेसह वाळवा तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात शासकीय निधीच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे . रामलिंग बेटाच्या विकासासाठी महायुतीच्या सरकारने मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे. देशाला एकसंघ ठेवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येकाच्या घरोघरी पोहचले आहेत. त्यामुळे महापूर व कोरोनाच्या काळात अधिवेशन अर्धवट सोडून मतदारसंघातील… Continue reading संकटाच्या वेळी पाठीशी उभा राहणाऱ्या धैर्यशील मानेंना निवडून द्या-सदाभाऊ खोत

आमदार अमल महाडिक यांच्या प्रचाराचा झंजावत सुरुच..!

गावच्या पारावर -मंदिराच्या पायऱ्यावर कधी चालत तर कधी बुलेटने प्रचार कोल्हापूर (प्रतिनिधी ) – लोकसभा महायुतीचे उमेदवार प्रा . संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मा.आमदार अमल महाडिक यांनी प्रचाराचा झंजावाती दौरा चालू ठेवला आहे. गावच्या पारावर, मंदिराच्या पायऱ्यावर, कधी चालत तर कधी बुलेट वरून.. कधी दुकानदाराशी थेट संवाद तर कधी महिला वर्गांना अभिवादन करत त्यांचा लहान… Continue reading आमदार अमल महाडिक यांच्या प्रचाराचा झंजावत सुरुच..!

हुतात्मा परिवार व धरणग्रस्त खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी राहतील- गौरव नायकवडी

वाळवा ( प्रतिनिधी ) : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हुतात्मा संकुल व शेतकरी कामगार धरणग्रस्त यांचा संवाद मेळावा कामगार भवन वाळवा येथे वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या वेळी हुतात्मा संकुलातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.वाळवा तालुक्यांचे युवा नेते हुतात्मा साखर कारखान्याचे संचालक,हुतात्मा सहकारी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष… Continue reading हुतात्मा परिवार व धरणग्रस्त खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी राहतील- गौरव नायकवडी

कागल विधानसभा मतदारसंघातून प्रा. संजय मंडलिक यांना मोठे मताधिक्य देऊ – गोकुळ संघाचे संचालक नविद मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी ) : कागल येथील महायुतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आणुर गावातील सर्वपक्षीय प्रमुख नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला गोकुळ दूध संघाचे संचालक .नविद मुश्रीफ मार्गदर्शन करताना म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांचे हात बळकट… Continue reading कागल विधानसभा मतदारसंघातून प्रा. संजय मंडलिक यांना मोठे मताधिक्य देऊ – गोकुळ संघाचे संचालक नविद मुश्रीफ

error: Content is protected !!