टोप (प्रतिनिधी ) – शिरोली औद्योगिक वसाहतीमधील दत्त फौंड्रीला शाॅर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत कंपनीचे ऑफिस जळून लाखोचे नुकसान झाले वेळेवर आग्नीशमनच्या बंबास पाचारण केल्याने आग आटोक्यात आली .

मिळालेल्या माहितीनुसार, शिरोली औद्योगिक वसाहतीमधील जाफराणी वजन काट्या जवळ असणाऱ्या दत्त फौंड्रीला आज सायंकाळी पाच वाजण्यासुमार कंपनीच्या ट्रान्सफॉर्ममध्ये अचानक पणे बिघाड होऊन शाॅर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे पण ही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही कारण म्हणजे कंपनीतील काही कर्मचारीच्या मते असे समजते कि भट्टीमधील निघणारा गरम स्लॅग हा कंपनीच्या दर्शनी बाजूस दक्षिण दिशेच्या भागात टाकला जातो त्याच भागात काही फुटावर कंपनीच्या प्रायव्हेट ट्रान्सफॉर्म देखील आहे . कंपनीची दर्शनीय बाजू ही पूर्णपणे फायबर ग्लासची असल्याने दक्षिण बाजूच्या भागास आग लागून या आगीने बघता क्षणीच रौद्ररूप धारण करत ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने कंपनीत शाॅर्ट सर्किट होऊन मोठ्या प्रमाणात आगीचे व धुराचे लोट हवेत पसरले .

या आगीने रौद्ररूप धरण केल्यावर आग आटोक्यात आणण्यासाठी कोल्हापूर येथील आग्नीषमणच्या जवानाना पाचारण करण्यात आले दोन आग्नीषमण बंबाच्या जवानानी पाण्याचा मारा करून शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. पण आगीने जर का कंपनीच्या फौंड्री विभागात प्रवेश केला असता तर अनेक कामगार कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतले असते नशीब बलत्तर म्हणून कामगार कर्मचाऱ्यांना काही झाले नाही .

ही घटना सायंकाळी साडेचार पाच वाजण्यासुमार घडल्याने फस्ट शिप्टमध्ये काम करून घरी जाणाऱ्या कर्मचार्यांची धावाधाव सुरू झाली कोणी मोबाईल घेवून त्याचे व्हिडिओ , फोटो काढून सोशल मिडीयावर आपलोड करून आपल्या मित्र परिवार शेअर करण्यात मग्न असल्याचे दिसत होते . पण या आगीत कंपनीचे लाखोचे नुकसान झाले आहे .