कोल्हापूर ( प्रतिनिधी ) भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. यानिमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर मधील संयुक्त जोशी नगर निळा चौक येथे महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कोल्हापूर मधील संयुक्त जोशी नगर निळा चौक येथे आज डॉ. बाबासाहेब आंबेकर यांच्या जयंती निमित्त चंद्रकांत पाटील यांनी महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पाटील यांनी म्हटले कि, महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर हे असे नाव आहे ज्यांची छाप जगाच्या पाठीवर अनेकांच्या मनावर उमटली आहे. त्यांचे विचार आणि जीवनप्रवास हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत.

द्रष्टे युगपुरुष असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येक भारतीयांच्या कल्याणासाठी बहुमूल्य कार्य केले आहे. समता, बंधुता आणि न्यायावर एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेले योगदान अजोड आहे. अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पाटील यांनी त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी वंदन केले.