बेळगाव ( प्रतिनिधी ) 27 फेब्रुवारी रोजी कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमीत्त मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. बेळगाव बापट गल्लीतील श्री कालिका देवी युवक मंडळाच्यावतीने दर वर्षी हा मराठी भाषा दिन साजरा केला असून, यावेळी गल्लीतील पंच श्री गोपाळराव केसरकर यांच्या हस्ते कवी वि. वा शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना महेश पावले यांनी बेळगावच्या बोली भाषेत जो गोडवा आहे तो अन्य भाषेत मिळणार नाही, तसेच भाषा बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर केला जातो तसे न करता अनेक परकीय भाषेला मराठी शब्दांचा पर्याय उपलब्ध आहेत त्याचा वापर करावा असे आवाहन केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी मराठी भाषिकांनी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा, आपल्या पाल्यांना मराठी वाङ्मय वाचनाची सवय लावावी. जेणे करून मराठी भाषा समृध्द होईल असे विचार मांडले. या वेळी सुनील मुरकुटे, भाऊ किल्लेकर, सुनील केसरकर, गजानन नीलजकर, महादेव केसरकर, नंदू मोरे, अभिषेक नीलजकर, अमोल किलेकर आदी उपस्थित होते.