नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहेत. परिणामी बर्‍याच राज्यांनी शाळा, महाविद्यालये  सुरू करण्यास सुरुवात केली आहे. काही राज्यांनी शाळा सुरूही केल्या आहेत. महाराष्ट्र राज्याने २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, यात दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील कोरोना संदर्भातील रिपोर्टने पालकांची चिंता वाढवली आहे.

एम्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सर्व पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ४०% रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. त्यातील ७३.०५% रुग्ण हे १२ वर्षाखालील आहे. अशा मुलांमध्ये कोरोना संसर्ग होतो. मात्र लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे ही मुले कोरोना पॉझिटिव्ह आहेत की नाही हे शोधणे फार कठीण असल्याचे म्हटले आहे.