टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील नागांवच्या उपसरपंच पदी विकास आघाडीच्या भिकाजी सावंत यांची बहुमताने निवड करण्यात आली. अनिल कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या विशेष निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच अरुण माळी होते. तर ग्रामविकास आधिकारी अनुपमा शिदनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागांव येथे ग्रामपंचायतीमध्ये विकास आघाडीचे नऊ आणि पाटील पँनेलचे आठ असे बलाबल होते. पण पाटील पँनेलचे दोन सदस्य फुटुन आघाडीत सामिल झाल्याने विकास आघाडीची संख्या अकरा झाली. तर लोकनियुक्त सरपंचही आघाडीचा असून आघाडी भक्कम झाली आहे. या विकास आघाडीमध्ये असलेल्या सर्व सदस्यांना उपसरपंचपदाची संधी देण्याकरिता काही महिन्यांचा कालावधी देण्यात येत आहे.

यावेळी निवडीसाठी आघाडीचे नेते गुंडा सांवत, सुनिल सुर्यवंशी, पं. स. सदस्य उत्तम सावंत, किरण मिठारी, विजय पाटील, दिपक लंबे, सतिश लंबे, सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.