आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ इंदौरला रवाना

कोल्हापूर : मध्य प्रदेशातील इंदौर येथील अहिल्यादेवी विद्यापीठात येत्या ४ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ आज रवाना झाला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे तसेच क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी या संघाला उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. कबड्डी संघात मार्गदर्शक म्हणून डॉ. रमेश… Continue reading आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ इंदौरला रवाना

आशियाई पॅरा गेम्समध्ये 100 पदकांचा टप्पा गाठणे हा अविस्मरणीय क्षण- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस भारतासाठी अविस्मरणीय ठरला. भारतीय खेळाडूंनी 100 नंबरचा टप्पा पार करत एकूंण १११ पदकांची कामे केली आहे. आशियाई पॅरा गेम्समध्ये 100 पदकांचा टप्पा गाठणे हा निव्वळ आनंदाचा आणि कर्तृत्वाचा क्षण आहे, असे मत उच्च व तंत्र… Continue reading आशियाई पॅरा गेम्समध्ये 100 पदकांचा टप्पा गाठणे हा अविस्मरणीय क्षण- मंत्री चंद्रकांत पाटील

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी मालोजीराजे छत्रपती यांची फेरनिवड….

कोल्हापूर (प्रतिनिधी) – वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी माजी आमदार व पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती यांची फेरनिवड करण्यात आली. सलग पाचव्यांदा फेरनिवड करण्यात आल्याने कोल्हापूरला मोठी संधी मिळाली आहे. मालोजीराजे हे कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष असून ते राष्ट्रीय खेळाडू आहेत.

World Cup 2023: ‘विराट’नं सांगितलं आपल्या यशाचं रहस्य

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारताने 5 पैकी 5 सामने जिंकून विश्वचषक2023 मध्ये गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. या काळात विराट कोहली यजमान संघाचा पाठलाग करताना महत्त्वाचा खेळाडू म्हणून आपला जागा निर्माण केली आहे. याबाबत त्याला प्रसार माध्यमांनी विचारले असता त्यानं आपल्या यशाचं रहस्य सांगितलं आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना विराट कोहलीने सांगितले की, ‘मी नेहमीच… Continue reading World Cup 2023: ‘विराट’नं सांगितलं आपल्या यशाचं रहस्य

यंदाचा विश्वचषक भारत***; शोएब अख्तरनं केली भविष्यवाणी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि सध्याचा क्रिकेट तज्ज्ञ शोएब अख्तरने 2023 च्या विश्वचषकातील टीम इंडियाची कामगिरी पाहिल्यानंतर म्हटले आहे की, भारत हा विश्वचषक जिंकू शकणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंतच्या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व 5 सामने जिंकले असून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये अव्वल… Continue reading यंदाचा विश्वचषक भारत***; शोएब अख्तरनं केली भविष्यवाणी

पोती घेऊन धावण्याच्या स्पर्धेत निखिल पोवार प्रथम

कळे (प्रतिनिधी) : येथील भैरवनाथ डेव्हलपर्स ग्रुपतर्फे घेण्यात आलेल्या पन्नास किलो पोती घेऊन धावण्याच्या स्पर्धेत निखिल बबन पोवार (रा. कणेरीपैकी पोवारवाडी, ता. पन्हाळा) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना पंधरा हजार रुपये व ढाल देऊन गौरविले. त्यांनी साडे चारशे मीटर अंतर ४२. ६९ सेकंदात पूर्ण केले. या स्पर्धेत श्रावण पाटील (रा. म्हालसवडे, ता. करवीर- ४३.३७ सेकंद), निलेश… Continue reading पोती घेऊन धावण्याच्या स्पर्धेत निखिल पोवार प्रथम

भारतानं पाकिस्तानला केवळ 191 मध्येच गुंडाळलं..!

गुजरात ( वृत्तसंस्था ) भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानवर सातत्याने वर्चस्व गाजवणाऱ्या भारताने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना मोठी धावसंख्या होऊ दिली नाही. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजीवर हल्ला चढवला आणि संपूर्ण… Continue reading भारतानं पाकिस्तानला केवळ 191 मध्येच गुंडाळलं..!

Arctic Open 2023: पी. व्ही. सिंधूची आगेकूच कायम; केला उपांत्य फेरीत प्रवेश

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधूने पहिला गेम गमावल्यानंतर आपली सर्वोत्तम कामगिरी केली आणि व्हिएतनामच्या थुई लिन्ह गुयेनचा 91 मिनिटांच्या लढतीत पराभव करून आर्क्टिक ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. आठव्या मानांकित भारतीयाने 20-22, 22-20, 21-18 असा विजय मिळवून जागतिक क्रमवारीत 26… Continue reading Arctic Open 2023: पी. व्ही. सिंधूची आगेकूच कायम; केला उपांत्य फेरीत प्रवेश

टोप येथील पायल सुतारला अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक

टोप (प्रतिनिधी) : नेपाळमधील पोखरा येथे झालेल्या १९ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत टोप येथील पायल प्रल्हाद सुतार हिने रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान या चार देशांचा समावेश होता. यापूर्वी पायल सुतार हिने यूथ गेम फेडरेशन ऑफ इंडियामार्फत जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे तिची नेपाळमधील पोखरा येथील… Continue reading टोप येथील पायल सुतारला अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक

भारत-पाकिस्तान यांच्यात उद्या हायव्होल्टेज सामना

अहमदाबाद : जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेल्या विश्वचषकातील हायव्होल्टेज सामन्याला आता काही तासांचा अवधी राहिला आहे. विश्वचषक स्पर्धेत 14 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धांमध्ये सामना रंगणार आहे. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष या सामन्याकडे लागले आहे. भारत-पाकिस्तान सामना म्हटले की, क्रिकेट चाहत्यांमध्ये हायटेन्शन असतं. दोन्ही संघांवरही जिंकण्याचे तितकेच दडपण असते. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत दोनही संघ प्रत्येकी… Continue reading भारत-पाकिस्तान यांच्यात उद्या हायव्होल्टेज सामना

error: Content is protected !!