कोल्हापूर : मध्य प्रदेशातील इंदौर येथील अहिल्यादेवी विद्यापीठात येत्या ४ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ आज रवाना झाला.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे तसेच क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी या संघाला उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. कबड्डी संघात मार्गदर्शक म्हणून डॉ. रमेश भेंडिगरी, डॉ. डी. बी. बिरनाळे आणि अजित शेळके संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत.

विद्यापीठाचा कबड्डी संघ पुढील प्रमाणे : साईप्रसाद तुकाराम पाटील (शाहू कॉलेज, कोल्हापूर), वैभव साताप्पा रबाडे (शाहू कॉलेज, कोल्हापूर), प्रतिक शामराव पाटील (शाहू कॉलेज, कोल्हापूर), सौरभ तानाजी फगरे (नाईट कॉलेज, इचलकरंजी), दीपक पांडुरंग पाटील (नाईट कॉलेज, इचलकरंजी), वैभव अधिकराव वाघमोडे (नाईट कॉलेज, इचलकरंजी), ऋषिकेश विलास जाधव (बी. एम. कॉलेज, रहिमतपूर) शुभम माणिक पाटील (बी.एम. कॉलेज, रहिमतपूर)