टोप (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मागील वर्षांपासून सर्व क्षेत्र अडचणीत आहेत. तर दुसरीकडे देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. इंधन दरातील जबर वाढीने आधीच वाहनधारक वैतागले असताना त्यांच्यासाठी आणखी एक वाईट बातमी आहे. कोल्हापूर आणि सातारा दरम्यान असणाऱ्या किणी, तासवडे या दोन्ही टोल नाक्यांवर दरवाढ करण्यात आली आहे. उद्या (बुधवार) एक जुलैपासून दरवाढीची अंमलबजावणी होणार आहे.

ही दरवाढ पाच रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत आहे. कार, जीप या वाहनांना पूर्वी ७५ तर आता ८० रपये असे दर लागू केले असून हलक्या मालवाहतूक वाहनांसाठी १३५ ऐवजी १४५ रुपये मोजावे लागणार आहेत. तर ट्रक, बस आणि कंटेनरला २६५ ऐवजी चक्क २९० रुपये द्यावे लागणार आहेत. यामुळे वाहनधारकांमधून संताप व्यक्त होत आहे. टोलच्या दुष्टचक्रातून कधी सुटका होणार, असा सवाल होत आहे.