पन्हाळा (प्रतिनिधी) : संजीवन शिक्षण समूहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सौर उर्जेवर चालणारी थंडर बाईक टू व्हीलर बनवली आहे. ही दुचाकी अडीच तास चार्जिंग केल्यावर ८० ते १०० किलोमीटर अंतर कापणार आहे.

या गाडीला ७२ होल्ट एंपियर लिथियम आर्यन बॅटरी वापरली असून बीएलडीसी मोटर चेन, पॉवर ट्रान्समिशन आहे. कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत गाडी जर डिस्चार्ज झाली तरीही दोन किलोमीटरपर्यंत गाडी पळणार आहे. ही गाडी सौर उर्जेवर चालणारी असल्याने ती आपोआप चार्ज होणार आहे. याला डिस्क ब्रेकची सोय असून ट्यूबलेस टायरही वापरण्यात आली आहे.

ही थंडर बाईक ऋषिकेश बेडगे, अमित शितोळे, विनयराज साळुंखे, मृणालिनी गायकवाड, ऋतुजा परीट यांनी तयार केली आहे. याला  संस्थापक पी.आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, प्राचार्य मोहन वनरोट्टी, विभाग प्रमुख प्रसाद कुलकर्णी, योगेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.