कोल्हापूर (प्रतिनिधी) ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे वीज ग्राहकांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत देखील ग्राहकांकडे वीजबिल वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. काही कर्मचारी ग्राहकांशी उद्धट वर्तन करत असल्याचे समोर येत आहे. वीज कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी असे वर्तन न थांबवल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी दिला आहे.

यावेळी ग्राहकांकडे उपलब्ध असलेली रक्कम तूर्तास भरून त्यांची वीज खंडित करू नये. एखाद्या ग्राहकाने बिलाच्या पन्नास टक्के रक्कम भरण्याची क्षमता नसेल तर त्याला तगादा लावू नये. ऑनलाईन पेमेंटमध्ये देखील हप्ते भरण्याची सुविधा द्यावी अशी मागणी आपण करण्यात आली.

यावेळी उत्तम पाटील, संतोष घाडगे, सुरज सूर्वे,  विशाल वाठरे, मोईन मोकाशी आदी उपस्थित होते.