इचलकरंजी (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील व्यवसाय सुमारे ९० दिवसांपासून बंद आहेत. मात्र, तीव्र जनभावना लक्षात घेऊन आजपासून (सोमवार) कोल्हापूर शहरातील दुकाने उघडण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) इचलकरंजी पालिकेच्या सभागृहात लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या सनियंत्रण बैठकीत व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी अभिजित पटवा आणि उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्यात वादावादी झाली. यानंतर पोवार यांच्या समर्थकांनी पटवा यांना अक्षरशः शिवीगाळ केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कोल्हापूरच्या धर्तीवर इचलकरंजीतील दुकाने सुरु करा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) इचलकरंजी पालिकेच्या सभागृहात लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. खा. धैर्यशील माने, नगराध्यक्ष अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, पोलीस प्रशासन, इचलकरंजी नागरिक मंच प्रणित व्यापारी संघटना, व्यापारी व नगरसेवक यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन तो शासनाकडे पाठवा, असा आदेश मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

त्यानंतर नगरपालिका सनियंत्रण समितीची बैठक सुरू असताना उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांची व इचलकरंजी नागरिक मंच अभिजित पटवा यांच्यामध्ये वादावादी झाली. यानंतर पोवार समर्थकांकडून अभिजित पटवा यांना कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ करण्यात आली. हा प्रकार नगराध्यक्ष स्वामी यांच्या दालनात आणि पोलीस प्रशासन, खासदार यांच्यासमोर घडल्याने नगरपालिकेमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी पोवार यांच्या कार्यकर्त्यांची पोलीस व नगरसेवक यांनी समजूत काढल्याने कार्यकर्ते शांत झाले. प्रचंड गदारोळ झाल्याने  पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात केला होता.

यावेळी नगरसेवक शशांक बावचकर, मनोज साळोखे, उदयसिंग पाटील, डीवायएसपी बी. बी. महामुनी, शिवाजी नगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सपोनि गजेंद्र लोहार, नियंत्रण समितीचे नगरसेवक उपस्थित होते.