आ. ऋतुराज पाटील यांनी शिष्टमंडळासह घेतली पोलीस अधीक्षकांची भेट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि  उपनगरातील चोऱ्यांच्या वाढत्या घटनाच्या पार्श्वभूमीवर आ. ऋतुराज पाटील यांनी जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. तसेच चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्या अशा सूचना केल्या. तसेच शहर आणि उपनगरात गस्त वाढवून मोरेवाडी, पाचगाव, जुना वाशी नाका, कळंबा या परिसरातील नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे लवकर दुरुस्त केले जातील,… Continue reading आ. ऋतुराज पाटील यांनी शिष्टमंडळासह घेतली पोलीस अधीक्षकांची भेट…

जयप्रभा स्टुडिओप्रश्नी रक्तदान शिबिराद्वारे अनोखे आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरची अस्मिता आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला जयप्रभा स्टुडिओ नामशेष होण्याच्या मार्गावर असून, तो वाचविण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व कलाप्रेमीतर्फे जयप्रभा स्टुडिओ बचावासाठी गेली १५८ दिवस अखंडपणे ‘जयप्रभा’च्या दारात आणि विविध ठिकाणी आंदोलन सुरु आहे. बुधवारी आंदोलकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. सध्या ब्लड बँकेमध्ये रक्ताचा पुरवठा व… Continue reading जयप्रभा स्टुडिओप्रश्नी रक्तदान शिबिराद्वारे अनोखे आंदोलन

होळकरांची राजमुद्रा नष्ट करणाऱ्यावर कारवाईची मागणी‌‌

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील अंबाबाई मंदिरातील नवग्रह मंदिरामधील चबुतऱ्यावरील होळकरची राजमुद्रा खोडून हेतूपुरस्सर मंदिराचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही प्रवृत्तींकडून झाला आहे. या प्रवृत्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करून ती राजमुद्रा पूर्ववत तयार करून बसवावी, अन्यथा या प्रश्नी आंदोलन छेडण्याचा इशारा मल्हार सेनेसह विविध संघटनांनी दिला आहे. अंबाबाई मंदिरात अनेक शिलालेख व बहुजनांची प्रतिके असणारे अनेक संदर्भ… Continue reading होळकरांची राजमुद्रा नष्ट करणाऱ्यावर कारवाईची मागणी‌‌

तिसंगी येथे विधवा महिलांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन तिसंगी, ता. गगनबावडा ग्रामपंचायतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण आणि सर्व विधवा महिलांमधून एक दिवसाचा सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यत्वाचा बहुमान देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती सरपंच बंकट थोडगे यांनी पत्राद्वारे दिली आहे. हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा महिलांच्या सन्मानार्थ अनिष्ट प्रथा निर्मूलनाचा क्रांतिकारी… Continue reading तिसंगी येथे विधवा महिलांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

विमानतळ विस्तारीकरणासाठी मौजे तामगांव जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाठी मूल्यांकन निश्चिती झाल्यानंतर आज (सोमवार) करवीर तालुक्यातील मौजे तामगांव येथील जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी जमीन मालकांना महाराष्ट्र विमानतळ कंपनीतर्फे ४८ लाख ५१ हजार ५६३ रुपयांचा धनादेश अदा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र विमानतळ कंपनीतर्फे अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, उमेश लाहोटी, करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, नायब तहसिलदार (महसूल) विजय… Continue reading विमानतळ विस्तारीकरणासाठी मौजे तामगांव जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण…

सादळे-मादळे परिसरात बिबट्याचे दर्शन : परिसरात भितीचे वातावरण

टोप (प्रतिनिधी) :  जोतिबा डोंगराच्या पायथ्याला काल (रविवार) बिबट्या पाहल्याचा दावा काहीजणांनी केला होता. तसेच त्याचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला. पण फोटो स्पष्टपणे दिसत नसल्याने वाघ की बिबट्या याबाबत शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आज (सोमवार) रात्री ८ च्या सुमारास सादळे परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने येथे आलेले पर्यटक, वाहनचालक आणि स्थानिकांना झाल्याने परिसरात भितीचे… Continue reading सादळे-मादळे परिसरात बिबट्याचे दर्शन : परिसरात भितीचे वातावरण

बालकामगार विरोधी मोहिमेत आढळलेली बालके मूळ राज्यात परतली : शिल्पा पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) ; बाल कामगार शोध मोहीमेत आढळून आलेल्या ३३ बालकांना पश्चिम बंगाल आणि ओडीसा राज्यातील त्यांच्या मूळ जिल्ह्यात पाठवण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली. तसेच या बालकांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यासाठी तिकिटे उपलब्ध होत नसताना जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून राखीव कोट्यातून तिकीट… Continue reading बालकामगार विरोधी मोहिमेत आढळलेली बालके मूळ राज्यात परतली : शिल्पा पाटील

कर्तव्यदक्ष सीईओंच्या भेटीने धनगरवाड्याच्या ‘आशा’ पल्लवीत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मंत्र्यांच्या दौऱ्यात मोठमोठ्या शासकीय कार्यक्रमात मिरवणारे अधिकारी समाजाने बघितलेत; मात्र समाजात ग्राऊंडवर उतरून काम करणारे अधिकारी क्वचित दिसतात. कोल्हापूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आहेतच, शिवाय संवेदनशील असणाऱ्या चव्हाण यांच्या अनोख्या कामाचे दर्शन नुकतेच धनगरवाड्यास झाले. पोलिओमुळे एका पायाने अधू असूनही चव्हाण यांनी आजरा तालुक्यातील हरपवडे पैकी धनगरवाड्याला… Continue reading कर्तव्यदक्ष सीईओंच्या भेटीने धनगरवाड्याच्या ‘आशा’ पल्लवीत

कागल येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

कागल (प्रतिनिधी) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथे शाहू ग्रुपचे अध्यक्ष भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांनी अभिवादन केले. यावेळी साखर कारखान्याचे संचालक सतीश पाटील, राजे बँकेचे संचालक उमेश सावंत, रमीज मुजावर, भाजपचे शहराध्यक्ष सुशांत… Continue reading कागल येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

पन्हाळागडाचे संवर्धन करण्याची ‘शिवप्रतिष्ठान’ची मागणी

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळागडावरील पडझड झालेल्या बुरुज, तटबंदी, ऐतिहासिक वास्तू यांचे संवर्धन लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी तहसीलदार, नगरपरिषद, पुरातत्व विभाग यांच्याकडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पन्हाळागडावरील बुरुज, तटबंदी जीर्ण झाली असून, पावसाच्या माऱ्याने वेगाने ढासळत आहेत. त्याचे वेळोवेळी जतन व संवर्धन पुरातत्व विभाग करत नाही, याकडे लक्ष वेधण्यासाठी प्राथमिक स्वरुपात निवेदन… Continue reading पन्हाळागडाचे संवर्धन करण्याची ‘शिवप्रतिष्ठान’ची मागणी

error: Content is protected !!