कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाठी मूल्यांकन निश्चिती झाल्यानंतर आज (सोमवार) करवीर तालुक्यातील मौजे तामगांव येथील जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी जमीन मालकांना महाराष्ट्र विमानतळ कंपनीतर्फे ४८ लाख ५१ हजार ५६३ रुपयांचा धनादेश अदा करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र विमानतळ कंपनीतर्फे अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, उमेश लाहोटी, करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, नायब तहसिलदार (महसूल) विजय जाधव उपस्थित होते.