टोप (प्रतिनिधी) :  जोतिबा डोंगराच्या पायथ्याला काल (रविवार) बिबट्या पाहल्याचा दावा काहीजणांनी केला होता. तसेच त्याचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला. पण फोटो स्पष्टपणे दिसत नसल्याने वाघ की बिबट्या याबाबत शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आज (सोमवार) रात्री ८ च्या सुमारास सादळे परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने येथे आलेले पर्यटक, वाहनचालक आणि स्थानिकांना झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

सादळे परिसरात मोठी शेती असून शेतकरी, जनावरांचा वावर याठिकाणी असतो. तर जोतीबाच्या दर्शनासाठी भाविक तसेच पर्यटकांचा वावर खूप प्रमाणात आहे. यामुळे वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडून सुरक्षित अधिवासात सोडावे. अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तर ग्रामपंचायतने याठिकाणी फलकाद्वारे जनजागृती करत नागरिकांना सावध राहण्याच्या सुचना द्याव्यात अशीही मागणी आता जोर धरु लागली आहे.