कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरची अस्मिता आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला जयप्रभा स्टुडिओ नामशेष होण्याच्या मार्गावर असून, तो वाचविण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व कलाप्रेमीतर्फे जयप्रभा स्टुडिओ बचावासाठी गेली १५८ दिवस अखंडपणे ‘जयप्रभा’च्या दारात आणि विविध ठिकाणी आंदोलन सुरु आहे. बुधवारी आंदोलकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

सध्या ब्लड बँकेमध्ये रक्ताचा पुरवठा व साठा कमी असल्यामुळे आंदोलनामार्फत एक सामाजिक उपक्रम म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व जीवनधारा ब्लड बँक कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलनाच्या १५८ दिवसानिमित्त जयप्रभा स्टुडिओ आंदोलन स्थळी सकाळी ११ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात कलाप्रेमी, चित्रकर्मी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

दादू संकपाळ, रणजित जाधव, सुनील मुसळे, अमर मठपती, राहुल राजशेखर, रवींद्र बोरगांवकर, शिरीष उदाळे , अमर मोरे, राज पाटील, सागर भोसले, समाधान सावंत, विनायक झगडे, अवधूत जोशी, राजीव पोळ, राजू माळकर, जितेश कांबळे, रोहन जाधव, प्रसाद तास, सतेज स्वामी, विनायक महामुनी, नजाकत मुश्रीफ, सिद्धेश मंगेशकर, राहुल मोरे, उमेश बोळके, मदन पलंगे, सूरज झोन्जगे, रोहन पाटील इत्यादींनी रक्तदान केले.

या शिबिरास उपाध्यक्ष धनाजी यमकर संचालक सतीश बिडकर, बाबा पार्टे, मिलिंद अष्टेकर, ज्यू. धुमाळ, मधुकर वाघे, जयप्रकाश परुळेकर, अनिल काशीकर, विजय ढेरे, आनंदा पुंदे, दीपक महामुनी, सुदेश कुलकर्णी, प्रमोद गिरी तसेच जीवनधारा ब्लड बँकेचे डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.