कागल (प्रतिनिधी) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथे शाहू ग्रुपचे अध्यक्ष भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांनी अभिवादन केले. यावेळी साखर कारखान्याचे संचालक सतीश पाटील, राजे बँकेचे संचालक उमेश सावंत, रमीज मुजावर, भाजपचे शहराध्यक्ष सुशांत कालेकर, अरुण गुरव, उत्तम पाचगावे, कृष्णात सोनुले, विशाल आवळे आदी उपस्थित होते.