पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळागडावरील पडझड झालेल्या बुरुज, तटबंदी, ऐतिहासिक वास्तू यांचे संवर्धन लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी तहसीलदार, नगरपरिषद, पुरातत्व विभाग यांच्याकडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पन्हाळागडावरील बुरुज, तटबंदी जीर्ण झाली असून, पावसाच्या माऱ्याने वेगाने ढासळत आहेत. त्याचे वेळोवेळी जतन व संवर्धन पुरातत्व विभाग करत नाही, याकडे लक्ष वेधण्यासाठी प्राथमिक स्वरुपात निवेदन देत आहे. पन्हाळागडावर पर्यटक मद्यपान करण्यासाठी येतात. त्याला आटकाव होणे गरजेचे आहे. पन्हाळ्यावरील मद्य विक्रीचे दुकान बंद करावे तसेच गडाचे पावित्र्य राखून गडावरील बेकायदेशीर बांधकामे काढावीत, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख सुरेश यादव, बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख सुरेश रोकडे, शिवकार्य निष्ठाचे प्रमुख शिवाजी खोत यांच्यासह सुमारे शंभर जणांनी मोर्चा काढून हे निवेदन दिले.