युवा पत्रकार संघाची पन्हाळा येथे कार्यशाळा संपन्न…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने एकदिवसीय विभागीय कार्यशाळा पन्हाळगड येथे घेण्यात आली. कार्यशाळेत पन्हाळा परिसरातील ग्रामीण पत्रकार, छायाचित्रकार उपस्थित होते. कार्यशाळेत मार्गदर्शन करनाऱ्या मान्यवारंच्या वतीने पत्रकार संरक्षण कायदा, प्रिंट मिडिया व डिजिटल मिडियामध्ये पत्रकारीतेचा बदल होत चाललेल्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.  यावेळी अॅ़ड. संदीप पवार म्हणाले, पत्रकार संरक्षण संदर्भात संरक्षण कायदा… Continue reading युवा पत्रकार संघाची पन्हाळा येथे कार्यशाळा संपन्न…

कुंभोज येथे सकलात साहेब दर्ग्याचा कलशारोहण शुभारंभ पार…

कुंभोज (प्रतिनिधी) : हातकलंगले तालुक्यातील कुंभोज येथील हिंदू मुस्लिम धर्माच्या एकतेचे प्रतीक असणाऱ्या सकलात साहेब दर्ग्याची बांधकाम नुकतेच पूर्णत्वास आले. या दर्ग्यावरती विधीप्रमाणे आज धमगुरु मुनीरसाहेब पिरजादे रोजा शरिफ बागणी, यांच्या प्रमुख उपस्थितीत कलशारोहण समारंभ संपन्न झाला. धर्मगुरू मुनीरसाहेब पिरजादे यांच्या आशीर्वाचनानंतर धार्मिक पठण करण्यात आले. सकाळी नऊ वाजल्यापासून या कलशाचे कुंभोज एसटी स्टँडवर आगमन… Continue reading कुंभोज येथे सकलात साहेब दर्ग्याचा कलशारोहण शुभारंभ पार…

स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण, माहिती अधिकार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन आज (रविवार) कोल्हापूरातील साळुंखेनगर येथे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत निकम, महाराष्ट्र राज्य कायदेविषयक सल्लागार अॅड. परवेज पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुहास कुकडे, जिल्हा उपाध्यक्ष अभय तळप, जिल्हा सचिव संदीप मिठारी, करवीर तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख रूपाली शेलार, पन्हाळा तालुका… Continue reading स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण, माहिती अधिकार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन…

धामोड परिसरात पावसाची पुन्हा हजेरी : बळीराजा सुखावला.  

धामोड (प्रतिनिधी) : गेल्या आठ दिवसाच्या अविरत विश्रांतीनंतर आज (रविवार) सकाळपासून पावसाने धामोड परिसरात पुन्हा हजेरी लावली आहे. या वर्षी मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्यामुळे भातलावणीची कामे खोळंबली होती. जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाउस पडून देखील भाताची रोपे लागणी योग्य भात रोप नव्हती. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. आता पुष्प नक्षत्रात पुन्हा पावसाने सर्वत्र… Continue reading धामोड परिसरात पावसाची पुन्हा हजेरी : बळीराजा सुखावला.  

रुपणेवाडीच्या शाळेत महाडिक युवाशक्तीतर्फे रोपांचे वाटप

साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील रुपणेवाडी येथील शाळेत खासदार धनंजय महाडिक युवाशक्तीतर्फे मोफत वृक्ष वाटप करण्यात आले. गगनबावडा तालुक्यातील महाडिक गटाचे अस्तित्व काही दिवसांपूर्वी कमी झाल्याचे दिसत होते; परंतु धनंजय महाडिक भाजपकडून खासदार झाल्यापासून राजकारणात एक कमालीचा बदल घडला आहे. यामुळे गगनबावडा तालुक्यातील भाजप व महाडिक गटाचे कार्यकर्ते उत्साही झाले आहेत. धनंजय महाडिक खासदार झाल्यामुळे… Continue reading रुपणेवाडीच्या शाळेत महाडिक युवाशक्तीतर्फे रोपांचे वाटप

शिक्षक बँकेतर्फे कर्जावर एक अंकी व्याजदर देणार : अर्जुन पाटील

कुंभोज (प्रतिनिधी) : सुकाणू समितीच्या सल्ल्यानुसार बँकेचा कारभार चालवणार असून, सभासदांनी घेतलेल्या कर्जावर एक अंकी व्याजदर व चांगला लाभांश देण्यासाठी संस्था व सर्व संचालक बांधिल आहेत, असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक बँकेचे नूतन चेअरमन अर्जुन पाटील यांनी केले. प्राथमिक शिक्षक बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल सर्व नूतन संचालकांचा व सुकाणू समिती सदस्यांचा रा. शाहू स्वाभिमानी शिक्षक… Continue reading शिक्षक बँकेतर्फे कर्जावर एक अंकी व्याजदर देणार : अर्जुन पाटील

गडहिंग्लज उपनिबंधक कार्यालयामुळे नागरिकांचे त्रास वाचणार : मुश्रीफ

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजमध्ये नव्याने बांधकाम होणाऱ्या उपनिबंधक कार्यालय इमारतीमुळे नागरिकांचे त्रास वाचतील, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. या कार्यालयाकडे दस्त करण्यासाठी येणाऱ्यांना आवश्यक सर्व त्या सुविधा पुरविल्या जातील, असेही ते म्हणाले. गडहिंग्लजमध्ये उपनिबंधक कार्यालय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात आमदार मुश्रीफ हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यातून सुसज्ज व अद्ययावत उपनिबंधक… Continue reading गडहिंग्लज उपनिबंधक कार्यालयामुळे नागरिकांचे त्रास वाचणार : मुश्रीफ

न्यू कॉलेजचे माजी ग्रंथपाल पी. सी. पाटील यांचे निधन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील न्यू कॉलेजचे माजी ग्रंथपाल पी. सी. पाटील (वय ८०) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. शिवाजी विद्यापीठातील अधिसभा सदस्यसह चंदगड तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांवर त्यांनी काम केले होते. ते उजळाईवाडी येथे राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गेली ४० वर्षे शेकडो विद्यार्थी,… Continue reading न्यू कॉलेजचे माजी ग्रंथपाल पी. सी. पाटील यांचे निधन

कुंभोजमध्ये समाजमंदिराच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरु

कुंभोज (प्रतिनिधी) : येथील एसटी स्टँड परिसरात असणाऱ्या मातंग समाजमंदिराच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा प्रारंभ माजी उपसरपंच दाविद घाडगे, सदाशिव महापुरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. गावांतर्गत सेवा सुविधा करण्याच्या उद्देशाने माध्यमातून मातंग समाजमंदिर संरक्षक भिंतीसाठी आमदार राजू बाबा आवळे यांच्या फंडातून दहा लाख रुपये देण्यात आले. कुंभोज परिसरात आमदार राजू बाबा आवळे यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा फंड… Continue reading कुंभोजमध्ये समाजमंदिराच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरु

कुरुंदवाडमध्ये हजरत दौलतशहा वली दर्ग्याच्या उरुसाला सुरुवात…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाडमधील ग्रामदैवत हजरत दौलतशहा वली यांच्या उरुसाला सुरूवात झाली आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या समानतेची शिकवण देणाऱ्या दौलतशहा दर्ग्याच्या उरूसाचे मानकरी गाव कामगार पोलीस पाटील रावसाहेब पाटील यांच्या हस्ते गलेफ व संदल अर्पण करण्यात आले. तर पोलीस प्रशासनातर्फे मानाचा गलेफ अर्पण करून उरूसाला प्रारंभ करण्यात आला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक व परंपरा… Continue reading कुरुंदवाडमध्ये हजरत दौलतशहा वली दर्ग्याच्या उरुसाला सुरुवात…

error: Content is protected !!