धामोड (प्रतिनिधी) : गेल्या आठ दिवसाच्या अविरत विश्रांतीनंतर आज (रविवार) सकाळपासून पावसाने धामोड परिसरात पुन्हा हजेरी लावली आहे.

या वर्षी मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्यामुळे भातलावणीची कामे खोळंबली होती. जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाउस पडून देखील भाताची रोपे लागणी योग्य भात रोप नव्हती. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. आता पुष्प नक्षत्रात पुन्हा पावसाने सर्वत्र हजेरी लावल्यामुळे उर्वरीत शेतीची सर्व कामे आटोपून घेण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली आहे.