कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन आज (रविवार) कोल्हापूरातील साळुंखेनगर येथे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत निकम, महाराष्ट्र राज्य कायदेविषयक सल्लागार अॅड. परवेज पठाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सुहास कुकडे, जिल्हा उपाध्यक्ष अभय तळप, जिल्हा सचिव संदीप मिठारी, करवीर तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख रूपाली शेलार, पन्हाळा तालुका महिला अध्यक्ष अॅड. माधुरी म्हेत्रे, महिला उपाध्यक्ष सुनील कुंभार, संघटक सुहास चव्हाण, सहसंघटक भूषण गराडे, ओंकार कुरणे, समर्थ कुकडे, विकास सुतार, निलेश पाटील, बाळासाहेब रेडेकर, रत्ना मंगेशकर, सचिन कोळी आदी उपस्थित होते.