कुंभोज (प्रतिनिधी) : येथील एसटी स्टँड परिसरात असणाऱ्या मातंग समाजमंदिराच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा प्रारंभ माजी उपसरपंच दाविद घाडगे, सदाशिव महापुरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

गावांतर्गत सेवा सुविधा करण्याच्या उद्देशाने माध्यमातून मातंग समाजमंदिर संरक्षक भिंतीसाठी आमदार राजू बाबा आवळे यांच्या फंडातून दहा लाख रुपये देण्यात आले. कुंभोज परिसरात आमदार राजू बाबा आवळे यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा फंड आला असून, या फंडातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत, असे सांगून दाविद घाटगे व सदाशिव महापरे यांनी आभार मानले आहेत. या कामाचे कॉन्ट्रॅक्टर शशिकांत शिंदे यांचा सत्कार मातंग समाजाच्या वतीने करण्यात आला.

यावेळी विश्वास मोहिते, नेताजी महापुरे, अशोक कांबळे, राहुल भोरे, माजी उपसरपंच प्रकाश तोरस्कर, जनार्दन शिंदे, सदाशिव महापुरे, धनाजी तिवडे, दाविद घाडगे उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात फंड उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार राजू बाबा आवळे यांच्या अभिनंदनाचा ठराव मातंग समाजाच्या वतीने करण्यात आला.