कोल्हापूर (प्रतिनिधी) : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने एकदिवसीय विभागीय कार्यशाळा पन्हाळगड येथे घेण्यात आली. कार्यशाळेत पन्हाळा परिसरातील ग्रामीण पत्रकार, छायाचित्रकार उपस्थित होते. कार्यशाळेत मार्गदर्शन करनाऱ्या मान्यवारंच्या वतीने पत्रकार संरक्षण कायदा, प्रिंट मिडिया व डिजिटल मिडियामध्ये पत्रकारीतेचा बदल होत चाललेल्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. 

यावेळी अॅ़ड. संदीप पवार म्हणाले, पत्रकार संरक्षण संदर्भात संरक्षण कायदा व्हावा अशी जेष्ठ पत्रकारांनी मागणी केली होती. तो कायदा आता पास झाला आहे. पत्रकारांनी बातमी व वार्तांकन करत असताना निर्भिड व निपक्षपणे केले पाहिजे. पत्रकारांना कोणतीही अडचण आल्यास, पत्रकार संरक्षण कायदा आणि इतर बाबी मी एक पत्रकार संघटनेचा घटक म्हणून पत्रकारांना मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी गोमटेश विद्यपीठचे व्हा. चेअरमन प्रशांत पाटील म्हणाले, पत्रकारांनी सत्य वस्तुस्थितीवर बातमी करून सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे. वाचक वर्गामध्ये अत्याधूनिक तंत्रज्ञानामुळे जलद गतीने पत्रकारितेत बदल होत चालल्याने विश्वासहर्ता कमी होत चालली आहे. पत्रकारांनी केवळ काम आणि व्यवसाय म्हणून पत्रकारितेकडे न पाहता वाचक वर्गामध्ये विश्वासहर्ता कसे टिकून राहील व न्यायिक दृष्टिकोनातून काम केले पाहिजे.

यावेळी पन्हाळा नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी, युवा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेबद्दल समाधान व्यक्त करून कौतुक केले. कार्यशाळेचा लाभ सर्व पत्रकारांना, सर्व वक्त्यांच्या वतीने केलेले मार्गदर्शन उपयुक्त ठरेल याचा मला विश्वास असल्याचे सांगितले.

यावेळी जावेद देवडी, तुकाराम कदम, मार्था भोसले, प्रकाश कांबळे, कौतुक नागवेकर, अभिजीत निर्मळे, सतीश चव्हाण, अजय शिंगे, शैलेश माने, सागर चौगुले, धीरज आयरे, सागर पाटील, उदय बेलवकर, पूजा आदी उपस्थित होते.