सानेगुरुजी-वाल्मिकी वसाहत जोडणारा पूल दुरुस्त करा

कोल्हापूर (प्रतिनिधी) साने गुरुजी वसाहत, साळोखेनगर आणि शिवगंगा कॉलनी यांना जोडणाऱ्या पुलाची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी ‘आप’च्या शिष्टमंडळाने महापालिकेचे उपशहर अभियंता एन. एस. पाटील यांच्याकडे केली. या पुलाचे बांधकाम ढासळले आहे. पुलावरील रस्त्याची एक बाजू खचलेली आहे. हा रस्ता खचल्याने अरुंद झाला असून, अवजड वाहनासाठी अत्यंत धोकदायक बनला आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालकांचा अंदाज… Continue reading सानेगुरुजी-वाल्मिकी वसाहत जोडणारा पूल दुरुस्त करा

कळे येथील शिबिरात ७० जणांचे रक्तदान

कळे (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कळे पन्हाळा येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन महिलांसह  ७० जणांनी रक्तदान केले. वैभव लक्ष्मी ब्लड बँकेने रक्तसंकलन केले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम झाल्याबद्द्ल साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश पोवार,… Continue reading कळे येथील शिबिरात ७० जणांचे रक्तदान

माझ्या पाठपुराव्यामुळेच नाईट लॉडिंग, धावपट्टीचा प्रश्न मार्गी : आ. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझा सततचा पाठपुरावा आणि सर्वांच्या सहकार्याने झालेल्या यशाचा आनंद कोल्हापूर विमानतळाबाबत झाला आहे. या संदर्भात दिल्लीत मी वेळोवेळी नागरी विमान उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. माझा सततचा पाठपुरावा आणि सर्वांच्या सहकार्यामुळेच कोल्हापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग आणि विस्तारित धावपट्टीचा प्रश्न मार्गी लागत असल्याचा दावा आ. सतेज पाटील यांनी प्रसिद्धी… Continue reading माझ्या पाठपुराव्यामुळेच नाईट लॉडिंग, धावपट्टीचा प्रश्न मार्गी : आ. सतेज पाटील

चौंडेश्वरी मंदिर परिसरातील सुशोभीकरणाची कामे पूर्ण

हमीदवाडा (प्रतिनिधी) : येथील ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी मंदिर परिसरातील सुशोभीकरणाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली आहेत. रखडलेल्या कामांबाबत मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. सुशोभीकरणाकरिता ‘क’ वर्ग विकास पर्यटन स्थळ या योजनेमधून १५ लाख रुपये मंजूर झाले होते. हे काम बुरहान सय्यद चिखली या ठेकेदाराला मिळाले होते. काम अपूर्ण असताना संबंधित ठेकेदाराला बांधकाम विभागाकडून संपूर्ण बिल… Continue reading चौंडेश्वरी मंदिर परिसरातील सुशोभीकरणाची कामे पूर्ण

भडगाव उपसरपंचपदी पुंडलिक भांडवले

मुरगूड (प्रतिनिधी) : भडगाव, ता. कागल येथील उपसरपंचपदी पुंडलिक भांडवले निवड झाली. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिलीप चौगले होते. उपसरपंच आनंदा गोविंद सुतार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर भांडवले यांची उपसरपंचपदी निवड झाली. भांडवले हे बिद्री सह साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक प्रविणसिंह पाटील गटाचे आहेत. यावेळी एम. एस. पाटील, बी. एम. पाटील, दिलीप पाटील, विश्वनाथ… Continue reading भडगाव उपसरपंचपदी पुंडलिक भांडवले

कोल्हापूर युवासेनेतर्फे अनोख्या पद्धतीने वृक्षारोपण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर युवासेनेच्या वतीने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोख्या पद्धतीने आज (सोमवार) वृक्षारोपण करण्यात आले. शिवसेना पक्षामध्ये ज्या पद्धतीने आताच्या स्तिथीला घडामोडी चालू आहेत, याला अनुसरून जे जे या कठीण व संघर्षमय काळात मूळच्या शिवसेनेत कट्टर राहिले त्या संजय राऊत, गजानन कीर्तीकर, अनिल देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत, राजन… Continue reading कोल्हापूर युवासेनेतर्फे अनोख्या पद्धतीने वृक्षारोपण

रोट्रॅक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजनचा पदग्रहण उत्साहात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेली सात वर्षे समाजातील तृतीयपंथी समाजाला सोबत घेऊन,समान वागणूक देऊन रोट्रॅक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजन कोल्हापूर या क्लबचे सुरु असलेले समाजकार्य निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे, असे मोश्मी आवाडे यांनी सांगितले. रोट्रॅक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजन कोल्हापूरच्या आठव्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. प्रेरणा पाटील-शेळके यांनी अध्यक्ष… Continue reading रोट्रॅक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजनचा पदग्रहण उत्साहात

कागलसाठी ७० कोटींचा निधी आणला : मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : कागल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या अडीच वर्षांत ७० कोटी रुपये तसेच गडहिंग्लज व मुरगूड शहरांच्या विकासासाठीही मोठ्या प्रमाणात निधी आणला, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. या तिन्ही शहरांच्या विकासासाठी मागेल तेवढा निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी आभारही मानले. श्रीमंत जयसिंगराव पार्कसह श्रमिक वसाहत, आधार कॉलनी व समर्थ कॉलनीतील… Continue reading कागलसाठी ७० कोटींचा निधी आणला : मुश्रीफ

आजच्या पन्हाळगड आंदोलनाबाबत छ. संभाजीराजेंनी दिलेली प्रतिक्रिया…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज (रविवार) झालेल्या पन्हाळगडावरचे आंदोलन निंदनीय आहे. ऐतिहासिक महत्व असणाऱ्या किल्ल्यावर जो प्रकार घडला आहे हा प्रकार निषेधार्थ असल्याचे सांगत छ. संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया सोशल मिडीयावर व्यक्त केली. छ. संभाजीराजे यांनी, गडावर एकच गाव वसलेले असून अनेक हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि लॉजेस मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे गडाचे पावित्र्य धोक्यात आले… Continue reading आजच्या पन्हाळगड आंदोलनाबाबत छ. संभाजीराजेंनी दिलेली प्रतिक्रिया…

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना मातृशोक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे आज (रविवार) कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. सरस्वती पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आ. चंद्रकांत पाटील आणि सर्व भावंडावर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार… Continue reading भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना मातृशोक…

error: Content is protected !!