साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील रुपणेवाडी येथील शाळेत खासदार धनंजय महाडिक युवाशक्तीतर्फे मोफत वृक्ष वाटप करण्यात आले.

गगनबावडा तालुक्यातील महाडिक गटाचे अस्तित्व काही दिवसांपूर्वी कमी झाल्याचे दिसत होते; परंतु धनंजय महाडिक भाजपकडून खासदार झाल्यापासून राजकारणात एक कमालीचा बदल घडला आहे. यामुळे गगनबावडा तालुक्यातील भाजप व महाडिक गटाचे कार्यकर्ते उत्साही झाले आहेत.

धनंजय महाडिक खासदार झाल्यामुळे व राज्यात भाजप सत्तेत आल्यामुळे गगनबावडा तालुक्यातील महाडिक युवा शक्तीला व भाजप गटाला एक वेगळेच व कमालीचे बळ मिळाले आहे. आगामी निवडणुकाही उत्साहाने लढवण्याच्या तयारीत आहेत.

वाढदिवसासह इतर कारणपरत्वे ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते; परंतु कोणतेही चांगले काम करण्यासाठी काहीतरी ठोस कारण असावे असे नाही, तर समाजासाठी काहीतरी चांगले काम करावे म्हणून महाडिक युवाशक्तीतर्फे रुपणेवाडीतील शाळेला रोपांचे वाटप करण्यात आले. हाच संदेश धनंजय महाडिक युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी समाजाला दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उत्तम बांडागळे, गणेश महाडिक, प्रवीण गावकर, अनिल डाकवे, सुनील बांडागळे, मंगेश डाकवे, महादेव वरेकर व चंद्रदीप गावकर व ग्रामस्थ उपस्थित होते.