कुंभोज (प्रतिनिधी) : हातकलंगले तालुक्यातील कुंभोज येथील हिंदू मुस्लिम धर्माच्या एकतेचे प्रतीक असणाऱ्या सकलात साहेब दर्ग्याची बांधकाम नुकतेच पूर्णत्वास आले. या दर्ग्यावरती विधीप्रमाणे आज धमगुरु मुनीरसाहेब पिरजादे रोजा शरिफ बागणी, यांच्या प्रमुख उपस्थितीत कलशारोहण समारंभ संपन्न झाला. धर्मगुरू मुनीरसाहेब पिरजादे यांच्या आशीर्वाचनानंतर धार्मिक पठण करण्यात आले.

सकाळी नऊ वाजल्यापासून या कलशाचे कुंभोज एसटी स्टँडवर आगमन झाले. नंतर हजरत शहाकाल साहेब यांच्या दर्ग्यात सदर कलशाची विधिवत पूजा करण्यात आली. धार्मिक पूजनानंतर या कलशाची दीपक चौक, मसुदी कट्टा, सुतार मोहल्लामार्गे भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांचा गजर व फटाक्याच्या आताशबाजीने संपूर्ण परिसरातील वातावरण भक्तिमय बनले होते.

धर्मगुरू मुनीर पिरजादे बागणी, यांच्या हस्ते दुपारी सकलात साहेब दर्ग्यावरती हा कलश स्थापन करण्यात आला. यावेळी सुतार मोहल्ला तसेच गावातील हिंदू-मुस्लिम अनेक भक्तगण उपस्थित होते. तर या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.