कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे आज (रविवार) कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली असा त्यांचा परिवार आहे.

सरस्वती पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आ. चंद्रकांत पाटील आणि सर्व भावंडावर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार केले. या संस्कारांच्या शिदोरीवरच आ. पाटील आणि त्यांचे सर्व‌ कुटुंबीय आयुष्यभर वाटचाल करीत आले आहेत.