कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर युवासेनेच्या वतीने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोख्या पद्धतीने आज (सोमवार) वृक्षारोपण करण्यात आले.

शिवसेना पक्षामध्ये ज्या पद्धतीने आताच्या स्तिथीला घडामोडी चालू आहेत, याला अनुसरून जे जे या कठीण व संघर्षमय काळात मूळच्या शिवसेनेत कट्टर राहिले त्या संजय राऊत, गजानन कीर्तीकर, अनिल देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत, राजन विचारे, प्रियांका चतुर्वेदी या सर्व खासदारांबरोबर अनिल परब, आदित्य ठाकरे, सचिन अहिर, अजय चौधरी, वैभव नाईक, सुनील राऊत, प्रकाश फातर्फेकर, सुनील प्रभू या सर्व आमदारांची नावे प्रत्येक लावलेल्या झाडाला देण्यात आली.

या सर्व झाडांचे संगोपन युवासेनेकडून केले जाईल, अशी ग्वाही सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली. शिवाजी पेठेतील न्यू हायस्कूल पेटाळा येथे या उपक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हा युवा अधिकारी मंजित माने व पदाधिकाऱ्यांनी केले होते.

शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुख्याध्यापक के. ई. पवार, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, महिला उपजिल्हा संघटक स्मिता सावंत, युवासेनेचे वैभव जाधव, संतोष कांदेकर, सनराज शिंदे, शेखर बारटक्के, रोहित वेढे, चैतन्य देश पांडे, कीर्तिकुमार जाधव, रघुनाथ भावे, इंद्रजित सुतार, केदार जोशी, युवती सेनेच्या पूनम पाटील, स्वेता सुतार, तेजू चौगुले, सानिका दामुगडे, सिद्धी दामुगडे, वैष्णवी खुरदरे आदी उपस्थित होते.