कळे (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कळे पन्हाळा येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन महिलांसह  ७० जणांनी रक्तदान केले. वैभव लक्ष्मी ब्लड बँकेने रक्तसंकलन केले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम झाल्याबद्द्ल साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.

शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश पोवार, युवासेना तालुकाप्रमुख जयराम पोवार, सरपंच सुभाष पाटील, उप तालुकाप्रमुख प्रशांत पोवार, शाखाप्रमुख बाजीराव नांगरे, अशोक डवंग, अमर भोमकर, अनिल चोपदार, संभाजी पाटील, आप्पा इंजुळकर, कृष्णात कदम, अनिल देशपांडे, सरदार गोसावी, सुभाष पोवार, दिलीप पाटील, दीपक चव्हाण, जनार्दन अतिग्रे, श्रीकांत जाधव, अमित गुरव, प्रकाश गुरव, कृष्णात गुरव, विजय ङवंग, ज्योतिराम पाटील, सचिन झुरे, कृष्णात कुंभार, प्रतीक्षा रामाणे, भाग्यश्री चोपदार, आकांक्षा गुरव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.