कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज (रविवार) झालेल्या पन्हाळगडावरचे आंदोलन निंदनीय आहे. ऐतिहासिक महत्व असणाऱ्या किल्ल्यावर जो प्रकार घडला आहे हा प्रकार निषेधार्थ असल्याचे सांगत छ. संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया सोशल मिडीयावर व्यक्त केली.

छ. संभाजीराजे यांनी, गडावर एकच गाव वसलेले असून अनेक हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि लॉजेस मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे गडाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. तर प्रशासनाने यावर त्वरीत कार्यवाही करावी करावी. याचा समुळ नायनाट करावा. तसेच मंगळवारी दिल्ली येथे गडकोट संवर्धनाबाबत केंद्रिय महासंचालिकाबरोबर बैठक असल्याचे छ. संभाजीराजे यांनी स्पष्ट केले,

तसेच फोर्ट फाऊंडेशन आणि स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात असणाऱ्या गडकोट किल्यांवरील होणारे प्रकार रोखणाऱ असल्याचे त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून सांगितले.