मुरगूड (प्रतिनिधी) : भडगाव, ता. कागल येथील उपसरपंचपदी पुंडलिक भांडवले निवड झाली. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिलीप चौगले होते. उपसरपंच आनंदा गोविंद सुतार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर भांडवले यांची उपसरपंचपदी निवड झाली. भांडवले हे बिद्री सह साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक प्रविणसिंह पाटील गटाचे आहेत. यावेळी एम. एस. पाटील, बी. एम. पाटील, दिलीप पाटील, विश्वनाथ अलका कांबळे, रेखा चौगले, ग्रामसेवक रणजीत विभुते आदी उपस्थित होते.