सुळे-आकुर्डे, अंबर्डे बंधाऱ्याला कचऱ्याचा विळखा

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील धामणी नदीवर असलेल्या सुळे-आकुर्डे, अंबर्डे कोल्हापुरी बंधाऱ्यात पुरामुळे विविध प्रकारचा कचरा अडकला आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यालगत अडकलेले लाकडे, कचरा, कातवेर काढण्याची मागणी होत आहे. धामणी नदीला जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आला होता. त्यामुळे बंधारे पाण्याखाली गेले होते. पुराने  लाकडी… Continue reading सुळे-आकुर्डे, अंबर्डे बंधाऱ्याला कचऱ्याचा विळखा

नाना पाटील यांची १२२ वी जयंती उत्साहात

कोल्हापूर : कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे नाना पाटलांची १२२ वी जयंती कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात झाली. गजानन विभूते यांनी प्रास्ताविकात कॉलनीला नाना पाटलांचे नाव देण्यामागील इतिहास स्पष्ट केला. अनिल चव्हाण यांनी आपल्या भाषणात नाना पाटलांचे सत्यशोधकी विचार, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम, प्रतिसरकारचे प्रमुख, गुंड आणि सावकाराला मारलेल्या पत्री इत्यादी माहिती सांगितली. निवास नलवडे… Continue reading नाना पाटील यांची १२२ वी जयंती उत्साहात

हर घर तिरंगा’ मोहिमेत सहाभागी व्हावे : कृष्णराज महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्वांनी ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन रेसर कृष्णराज महाडिक यांनी केले. रोट्रॅक्ट क्लब ऑफ के.आय.टी सनशाईन या क्लबच्या पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. रोटरी क्लब ऑफ सनराईजचे अध्यक्ष ऋषीकेष खोत यांच्या हस्ते आणि कृष्णराज महाडिक… Continue reading हर घर तिरंगा’ मोहिमेत सहाभागी व्हावे : कृष्णराज महाडिक

अखेरच्या पाच दिवसांत रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी

पुणे (प्रतिनिधी) :  न्यायालयाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करू. गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. गणेशोत्सवाच्या अखेरच्या पाच दिवसांत रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना  परवानगी असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा स्पष्ट केले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गणेशोत्सव… Continue reading अखेरच्या पाच दिवसांत रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी

क्रांतीदिनी होणार परिवर्तनाची सुरुवात : छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात होणार, अशी घोषणा ट्विटद्वारे केली आहे. ९ ऑगस्ट रोजी असणाऱ्या क्रांती दिनादिवशी तुळजापूर येथे भेटू, असेही त्यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठा वाद निर्माण होऊन तुळजापूर शहर बंद देखील ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे जनभावना दुखावली… Continue reading क्रांतीदिनी होणार परिवर्तनाची सुरुवात : छत्रपती संभाजीराजे

आजी-माजी सैनिकांना रुग्णसेवा मोफत देणार : डॉ. अनिल देशपांडे

आजरा (प्रतिनिधी) : आजी-माजी सैनिकांना मोफत रुग्णसेवा देण्याची घोषणा आजरा अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांनी केली आहे. डॉ. देशपांडे यांनी स्वतःच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त हा संकल्प जाहीर केला आहे. डॉ. देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णा-भाऊ सांस्कृतिक सभागृहात आज (मंगळवार) अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरमूअण्णा पाटील होते. स्वागत व प्रास्ताविक विजयकुमार पाटील… Continue reading आजी-माजी सैनिकांना रुग्णसेवा मोफत देणार : डॉ. अनिल देशपांडे

तिसंगी वीज उपकेंद्रामध्ये अनागोंदी कारभार

साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील राज्य विद्युत कंपनीच्या तिसंगी येथील उपकेंद्रामध्ये अनागोंदी कारभार सुरु असून, येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुक्कामी राहण्याची सूचना द्यावी, कार्यालयात स्वच्छता कायम राखावी, वीज ग्राहकांच्या कामांची तातडीने निर्गत करावी, अशी मागणी तिसंगीतील नागरिकांनी केली आहे. तिसंगीच्या उपकेंद्रामध्ये निवासी अधिकारी म्हणून कनिष्ठ अभियंता अथर्व कोळी काम करत असून, येथे मुक्कामी व्यवस्था असतानाही… Continue reading तिसंगी वीज उपकेंद्रामध्ये अनागोंदी कारभार

कागलमधील झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण अंतिम टप्प्यात : मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागलमधील ५४ झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. येत्या आठवडाभरात या संदर्भातील शेवटची बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब होईल, असेही ते म्हणाले. कागल- मुरगुड मार्गावरील वडवाडी येथील कुरणे वसाहतीमध्ये या झोपड्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या नियमितीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण झाल्यानंतर शासकीय… Continue reading कागलमधील झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण अंतिम टप्प्यात : मुश्रीफ

कुरुंदवाडमध्ये विविध संस्थेत आण्णा भाऊ साठे जयंती

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : येथील नगरपरिषद, मातंग समाज वसाहत, विद्यालय, महाविद्यालय व विविध संस्थेत लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. येथील पालिका सभागृहात लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पालिका निरीक्षक पूजा पाटील, प्रदीप बोरगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. नगरसेवक उदय डांगे, अक्षय आलासे, तानाजी आलासे, कार्यालय… Continue reading कुरुंदवाडमध्ये विविध संस्थेत आण्णा भाऊ साठे जयंती

डिजिटल मीडियाच प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचला : बलकवडे

कोल्हापूर (प्रातिनिधी) : लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामध्ये आज प्रामुख्याने सर्वप्रथम डिजिटल मीडिया प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला असल्याचे मत जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केले. आज (सोमवार) डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रमुख बलकवडे यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या बरोबर जिल्ह्यातील विविध घटनांचा आढावा घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. भविष्यात… Continue reading डिजिटल मीडियाच प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचला : बलकवडे

error: Content is protected !!