चंद्रदीप नरके गटाकडून करवीरमध्ये संभाजी पाटील यांना संधी..?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रयाग चिखली येथील चंद्रदीप नरके यांचे कट्टर कार्यकर्ते संभाजी रंगराव पाटील उर्फ एस.आर. यांना करवीर मतदार संघातून उमेदवारी द्यायचे निश्चित झाले असल्याचे खात्रीपूर्वक समजते. या अगोदर ए.वाय.पाटील यांच्याकडून प्रा. किसन चौगले आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून प्रकाश पाटील याना गोकुळमध्ये संधी दिली असल्याची खात्रीशीर चर्चा आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना गोकुळमध्ये संधी दिली जात… Continue reading चंद्रदीप नरके गटाकडून करवीरमध्ये संभाजी पाटील यांना संधी..?

‘गोकुळ’बाबत राजू शेट्टी दोन दिवसात जाहीर करणार निर्णय  

हातकणंगले (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शिरोळ येथील आपल्या निवस्थानी तीन दिवस अलगीकरण झाले आहेत. नुकतेच ते पंढरपूरहून भगीरथ भालके यांच्या प्रचारातून घरी परतले. त्यांच्यासोबत असणारे सहकारी कोरोनाग्रस्त असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना ३ दिवस घरी थांबण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान गोकुळबाबत शेट्टी दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करणार… Continue reading ‘गोकुळ’बाबत राजू शेट्टी दोन दिवसात जाहीर करणार निर्णय  

…तर सत्तारूढ आघाडीचा उघड प्रचार करू : सदाभाऊ खोत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीला आपला पाठिंबा आहे. कोरोनामुळे आपण प्रत्यक्षात मैदानात उतरून भाग घेऊ शकत नसलो, तरी सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी बोलावले, तर उघड त्यांचा प्रचार करू, अशी भूमिका रयत क्रांती संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतली आहे. दरम्यान, राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या भूमिकेला दूध संघाच्या… Continue reading …तर सत्तारूढ आघाडीचा उघड प्रचार करू : सदाभाऊ खोत

माजी खासदार राजू शेट्टी क्वारंटाईन   

हातकणंगले (प्रतिनिधी) : सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी शिरोळ येथील निवासस्थानी क्वारंटाईन झाले आहेत. मंगळवेढा- पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी शेट्टी पंढरपूरला गेले होते. यादरम्यान, त्यांचा कोरोनाची लागण झालेल्या सहकाऱ्यांशी संपर्क आल्याने त्यांना  डॉक्टरांनी क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार ते शिरोळ येथील निवासस्थानी ३ दिवसांपासून… Continue reading माजी खासदार राजू शेट्टी क्वारंटाईन   

डोकानियाला सोडवण्यासाठी दोन विरोधी पक्षनेते का गेले ? : नवाब मलिक

मुंबई (प्रतिनिधी) :  ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर संपूर्ण राज्यातील भाजप का घाबरत आहे ? डोकानियाला सोडवण्यासाठी या राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले?, असा सवाल करून याबाबत त्यांचा काही संबंध आहे का याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.     देवेंद्र फडणवीस,… Continue reading डोकानियाला सोडवण्यासाठी दोन विरोधी पक्षनेते का गेले ? : नवाब मलिक

‘त्यांच्या’ मृत्यूशी गोकुळ निवडणुकीचा काय संबंध ? : ना. हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डोणोली (ता. शाहूवाडी) येथील सुभाष पाटील हे बँकेचे कर्मचारी  असल्याने ते हजारो लोकांशी संपर्कात येत होते. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. त्यातून त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्याचा गोकुळच्या निवडणुकीचा काय संबंध ?, असा सवाल करून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या आरोपाला आज (रविवार) पत्रकार परिषदेत… Continue reading ‘त्यांच्या’ मृत्यूशी गोकुळ निवडणुकीचा काय संबंध ? : ना. हसन मुश्रीफ

…तर ठरावधारकांच्या जीवाची जबाबदारी दोन्ही पॅनेलवर : महेश कोरी (व्हिडिओ)

‘गोकुळ’च्या निवडणुकीत ठरावधारक आणि संबंधित इतरांना काही झाले, तर याची जबाबदारी दोन्ही पॅनेलवर असणार आहे, असे गडहिंग्लजचे उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी ‘लाईव्ह मराठी’शी संवाद साधताना म्हटले आहे.  

कोरोनाबाधित ‘गोकुळ’ ठरावधारकांची जबाबदारी पालकमंत्र्यांचीच : नाथाजी पाटील (व्हिडिओ)

गोकुळच्या एका ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यू झाला तर सुमारे ५० ते ६० ठरावधारक बाधित झाले आहेत. निवडणुकीचा आग्रह धरणारे पालकमंत्रीच याला जबाबदार असल्याचा आरोप भाजपा जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील यांनी केला.  

‘गोकुळ’च्या मतदारांवर प्रचंड मानसिक दडपण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघासाठी २ मे रोजी होणारी निवडणूक अतिशय अटीतटीची होणार हे स्पष्ट आहे. या निवडणुकीत असलेला मतदार जिल्ह्यातील प्राथमिक दूध संघाचा प्रतिनिधी आहे. काही अपवाद वगळता सामान्य कुटुंबातील असलेल्या या मतदारांकडे मते मागण्यासाठी येणारे दिग्गज उमेदवार या मतदारांसाठी प्रचंड मानसिक दडपणाचे कारण बनत आहेत. गोकुळ निवडणुकीत मत कोणाला द्यायचे हे जरी मतदाराने आधीच… Continue reading ‘गोकुळ’च्या मतदारांवर प्रचंड मानसिक दडपण…

‘गोकुळ’ निवडणुकीवर कोरोनाचे सावट ; आणखी एक ठरावधारक अत्यवस्थ?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज (शनिवार) सकाळी शाहूवाडी तालुक्यातील गोकुळचे एक ठरावधारक कोरोनामुळे दगावले आहेत. तर आणखी एक ठरावधारक कोरोनामुळे अत्यवस्थ असल्याचे समजते. संबंधित ठरावधारकावर जयसिंगपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. यामुळे गोकुळच्या निवडणुकीला कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना दिसून येत आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने लॉकडाउन जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका… Continue reading ‘गोकुळ’ निवडणुकीवर कोरोनाचे सावट ; आणखी एक ठरावधारक अत्यवस्थ?

error: Content is protected !!