मुंबई (प्रतिनिधी) :  ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर संपूर्ण राज्यातील भाजप का घाबरत आहे ? डोकानियाला सोडवण्यासाठी या राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले?, असा सवाल करून याबाबत त्यांचा काही संबंध आहे का याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.    

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे सर्वजण रात्री सव्वा अकरा वाजता बीकेसीला पोहोचले. पण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीला बोलावल्यानंतर हे नेते का जातात हा मोठा प्रश्न आहे.

नवाब मलिक म्हणाले की, राज्यात कुठेही साठा मिळणार नाही, यासाठी भाजप प्रयत्न करत आहेत. साठा देऊ शकतात त्यांना ऑर्डर द्या, अशी भूमिका भाजपच्या लोकांकडून घेतली जात आहेत. पोलीस यंत्रणा काळा बाजार रोखण्यासाठी जनतेसाठी काम करत आहे. परंतु डोकानियाला बोलावल्यानंतर भाजप त्यांची वकिली का करत  आहे ? फडणवीस वकील आहेत. ते वकीलपत्र घेऊन बाजू मांडत होते की त्यांचे संबंध आहेत म्हणून मांडत होते? याचा खुलासा केला पाहिजे, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.