कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीला आपला पाठिंबा आहे. कोरोनामुळे आपण प्रत्यक्षात मैदानात उतरून भाग घेऊ शकत नसलो, तरी सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी बोलावले, तर उघड त्यांचा प्रचार करू, अशी भूमिका रयत क्रांती संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतली आहे.

दरम्यान, राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या भूमिकेला दूध संघाच्या निवडणुकीत कमालीचे महत्त्व आहे. दूधदर वाढीसाठी आंदोलन करून या नेत्यांनी दूध उत्पादकांना न्याय दिला होता. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत ते कोणती भूमिका घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गोकुळ निवडणुकीत भाजपने सत्तारूढ आघाडीला आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता सदाभाऊ खोत यांनीही सत्तारूढ आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.