कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रयाग चिखली येथील चंद्रदीप नरके यांचे कट्टर कार्यकर्ते संभाजी रंगराव पाटील उर्फ एस.आर. यांना करवीर मतदार संघातून उमेदवारी द्यायचे निश्चित झाले असल्याचे खात्रीपूर्वक समजते. या अगोदर ए.वाय.पाटील यांच्याकडून प्रा. किसन चौगले आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून प्रकाश पाटील याना गोकुळमध्ये संधी दिली असल्याची खात्रीशीर चर्चा आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना गोकुळमध्ये संधी दिली जात असल्यामुळे शेतकरी वर्गात चैतन्य निर्माण झाले आहे.

संभाजीराव पाटील हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांनी प्र. चिखली गावचे सरपंचपद भूषविलेले  आहे. चिखली विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन असून विद्यमान संचालक म्हणून काम करतात. दूध संस्था आणि शिक्षण संस्था संस्थापक आहेत. व्यवसायाने शेतकरी असल्यामुळे दुग्ध व्यवसायातील ज्ञान आहे. त्यांची पत्नी उमा पाटील या प्रयाग चिखलीच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. पूर्वी माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांचे ते कार्यकर्ते होते.

गेली पंधरा वर्षे माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून काम करतात. मी आजपर्यंत राजकीय कार्यकिर्दीत एकदाही हरलो नसल्यामुळे मला संधी मिळाली तर गोकुळच्या निवडणुकीत हमखास जिंकून येईन. तसेच भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्यास प्राधान्य देईल असे संभाजी पाटील यांनी सांगितले. एकंदरीत गोकुळच्या निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळत असल्यामुळे गेले कित्येक वर्षे गोकुलमध्ये असलेली वारसदारकी मोडीत निघत असल्याचे चित्र दिसून येते.