हातकणंगले (प्रतिनिधी) : सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी शिरोळ येथील निवासस्थानी क्वारंटाईन झाले आहेत.

मंगळवेढा- पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी शेट्टी पंढरपूरला गेले होते. यादरम्यान, त्यांचा कोरोनाची लागण झालेल्या सहकाऱ्यांशी संपर्क आल्याने त्यांना  डॉक्टरांनी क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार ते शिरोळ येथील निवासस्थानी ३ दिवसांपासून क्वारंटाईन झाले आहेत.

गोकुळ निवडणुकीविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, दोन्ही आघाडीचे नेते फोनवर संपर्कात असून आपल्या घरी येऊन भेटून गेले आहेत. कोणाच्या बाजूने राहायचे, याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. दोन दिवसानंतर प्रमुख कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी  सांगितले.